न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०१९) :- जगभरातल्या अत्याधुनिक रेल्वे प्रणाली वापरत असलेले रूळ पुणे मेट्रोसाठी वापरण्यात येणार आहेत. पुणे मेट्रोसाठी १८ मीटर व २५ मीटर या लांबीमध्ये रेल्वे रूळ वापरण्यात येणार आहेत. हे रेल्वे रूळ अत्याधुनिक फ्लॅश बट आणि अॅल्युमिनियम थर्मिट वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत.
जोडलेल्या रेल्वे रुळांचे अत्याधुनिक अल्ट्रा सॉनिक मशीनद्वारे टेस्टिंग केले जाणार आहे. रुळांचा वरचा भाग विशिष्ट तंत्रज्ञानाद्वारे कठीण केलेला असल्याने रुळांची झीज कमी होऊन रुळांचे आयुष्य वाढेल. पुणे मेट्रोचा उन्नत आणि भूमिगत मार्गाचा ट्रॅक बॅलास्ट लेस या प्रकारातला आहे. सामान्यतः रेल्वे प्रणालीत रेल्वे रूळ दगडाच्या खडीवर (बॅलास्ट) टाकण्यात येतात. ज्यामुळे रेल्वे रुळावरून कोच जाताना रेल्वे रूळ खाली दाबले जाऊन कुशनसारखा परिणाम साधता येतो.
त्यावर रूळ टाकण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे रूळ नागपूरहुन पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात आले आहेत. नागपूरहून कंटेनरच्या माध्यमातून रूळ पुण्याला आणले जातील. अतिरिक्त रूळ येताच रूळ बसवण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे.