- कट्टर दादाप्रेमी मा. पांडाभाऊ साने यांच्या आ. महेशदादा लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ्या…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांचा उद्या बुधवारी (दि. २७) रोजी वाढदिवस. आमचे आदरणीय नेतृत्व आ. महेशदादा यांची प्रतिमा जनमानसात विकासाचा बादशहा अशीच आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांनी गेल्या पाच वर्षात व्हीझन २०-२० च्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत.
तसेच पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या आमच्या दादांनी गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. समाविष्ट भागातील नगरसेवकांना महापालिकेतील विविध विभागात महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत विकासाची गंगा पोहोचविणाऱ्या आमच्या दादांनी आजवर राजकारण नाही तर समाजकारण केलं. त्यांच्या पाच वर्षाच्या काळात भोसरी मतदारसंघ हा नंदनवन ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत.
या पुढेही भोसरी मतदारसंघातील ‘जनसामान्यांचा सर्वांगिण विकास व्हावा’ या आमच्या दादांच्या शुद्ध हेतूला आम्हा कट्टर दादाप्रेमिंची सदैव खंबीरपणे साथ असेल. आपला उत्साह आणि विश्वास आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देवो. आपल्यावर मतदारसंघातील लोकांचा सदैव आशीर्वाद आणि कौतुकाची थाप कायम पाठीवर मिळो. मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय ’महेशदादांनी नजीकच्या काळात मंत्रिमंडळाचेही नेतृत्व करावे, दादांना भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी आई तुळजाभवानीचे आशीर्वाद मिळोत, याचा माझ्या व कट्टर दादाप्रेमिच्या शुभेच्छ्या…!
कट्टर दादाप्रेमी
मा. पांडाभाऊ साने (युवा नेते)