न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांची बदली करण्यात यावी. त्या कामाप्रती जबाबदार नाहीत, त्यांना कुठल्याही विषयाची माहिती मागितली तर त्या देत नाहीत.
शिक्षण विभागामध्ये सध्या सर्व कारभार अनागोंदी सुरू आहे. त्याला अधिकारी ज्योत्सना शिंदे या जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या जानेवारी महिन्याच्या महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. या वेळी शिक्षण विभागाच्या कामगिरीवर बोलताना नगरसेवकांनी ही मागणी केली.