न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०१९) :- मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेचे पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामेट्रोले दिले आहेत. त्यानुसार नामकरण करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे नाव दिल्याबद्दल पिंपरी महापालिकेच्या सभेत अजित पवार यांचे सोमवारी (दि. २०) महासभेत अभिनंदन करण्यात आले.
मेट्रोचे नामकरण पुणे महामेट्रो असे करण्यात आले आहे. मेट्रोच्या नावात पिंपरी-चिंचवड शहराच्या नालाचा उल्लेख केला गेला नव्हता. मेट्रोला पिंपरी-चिंचवड शहराचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी महाविकासआघाडी सरकारकडे केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
त्यानंतर उपमुख्यमंत्री, तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेचे पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याचे आदेश दिले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांना तसे निर्देश पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे नाव दिले जाणार आहे.