न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- वै. हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त ढोल – ताशांच्या गजरात व लेझीमवर विद्यार्थ्यांनी ठेका धरत भव्य मिरवणक काढण्यात आली. या मिरवणुकीचे उद्घाटन शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या.
यावेळी कुंदा भिसे, संजय भिसे, उन्नती सोशल फाउंडेशनचे विकास काटे, रोहन काटे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे, सविता आंबेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.