- पालकांमध्ये संतापाची लाट …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- सध्या १० वी ची सीबीएसई बोर्डाची परीक्षा सुरु आहे. आज इंग्रजी या विषयाचा पेपर होता. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगर वाकड येथे अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमधील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना १० वाजेपर्यंत रिपोर्टिंग करावयाचे होते.
या परीक्षेसाठी दूरच्या शाळेतीलही परीक्षार्थी आले होते. वाहतूक कोंडीमुळे त्यातील ३ परीक्षार्थींना रिपोर्टिंग करण्यासाठी अवघा काही मिनिटांचा उशीर झाला. परीक्षेला अर्धा तास बाकी असतानाही त्यांना परीक्षा केंद्रात जाऊ दिले गेले नाही.
त्यामुळे या परीक्षार्थीना परीक्षेस मुकावे लागले. याविषयी शाळा व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, अशा चाजक अटींमुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकवर्गात देखील संतापाचे वातावरण आहे.