न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२०) :- चिंचवड येथील प्रतिभा शिक्षण संकूल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय व कनिष्ठ व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालातील विद्यार्थ्यांच्या निबंध, वकृत्व, कविता वाचन, वाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचे पारितोषिक वितरण समारंभ अभिनेत्री झुझम, संस्थेचे सचिव दीपक शहा, संस्थेचे विशेष प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने मराठी भाषा विभागाकडून एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये अभिनेत्री मेघना झुझम यांनी ‘मी सावित्रीफुले बोलतेय’, या विषयावर एकपात्री नाटक सादर केले. आपल्या सुरेख अदाकारीने त्यांनी विद्यार्थ्यांची व उपस्थितांची मने जिंकली. सावित्रीबाईंचा जीवनपट मांडताना त्या म्हणाल्या, घराघरातील मुले शिकली पाहिजे. ही काळाजी गरज आहे. माणसातील माणूसपण प्रत्येकाने जपली पाहिजे. एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला पाहिजे. अंधश्रद्धेमध्ये अडकून राहू नका, सकारात्मक विचाराने आपले ध्येय गाठावे, असे आवाहन करून त्यांनी सावित्रीबाई फुलेंची कथा, व्यथा आपल्या सुंदर अभिनयातून सादर केली. सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी दिलेले योगदान तसेच त्यांनी किती भयानक यातना सहन केल्या आणि त्यातूनच स्त्री स्वातंत्र्याला वाव देवून स्त्रीयांचा मार्ग सुखकर केला. यावेळी अनेकांनी आपले मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सुरेखा कुंभार यांनी केले, तर सूत्रसंचालन विद्यार्थीनी श्रृती व अंकित यांनी केले तर, आभार प्राचार्या डॉ. प्राचार्या पोर्णिमा कदम यांनी केले.