न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२०) :- देशभरात लॉकडाउन असल्यामुळे किराणा दुकान, भाजी मंडई, एटीएमसमोर लोकांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. अशांमध्येच आपल्या जवळ असलेला व्यक्ती करोना बाधित तर नाही का? चाचणी केल्यानंतरच करोनाचा संसर्ग झाल्याचं समजते.
पण सरकारनं नागरिकांसाठी खास मोबाइल अॅप तयार केलं आहे. त्या अॅपच्या मदतीनं आजूबाजूला करोना बाधित कोणी असेल तर समजेल. या अॅपचं नाव ‘कोरोना कवच’ असं आहे. ‘कोरोना कवच’ हे लोकेशन आधारित मोबाइल अॅप आहे. Android आणि iOS वापरणाऱ्यांसाठी याची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयकडून तयार केलं आहे. या अॅपचे बिटा व्हर्जन गुगल प्ले स्टोरवर उपलबद्ध आहे. प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, हे अॅप आणखी प्रभावी करण्यावर केंद्र सरकारनं भर दिला असून त्यावर काम सुरू आहे.
लोकेशनवर आधारित असलेले ‘कोरोना कवच’ हे अॅप वापरकर्ता ज्या जागेवर जाणार डिटेक्ट करते. त्या लोकेशनवर जर एखाद्या करोना बाधिताच्या डेटाशी जुळला तर तुम्हाला लगेच अलर्टचं नोटिफिकेशन येईल. या अॅपमध्ये करोना बाधितांची लोकेशन जोडण्यात आली आहेत. त्या जागी जर अॅप वापरकर्ता गेल्यास अलर्ट तुम्हाला मिळेल.