- परिसरातील १८० जण होम क्वारंटाइन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- भोसरीत राहणाऱ्या व इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या परिसरातील १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
भोसरी येथील राहणारा हा विक्रेता महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहे. तो किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा करायचा.
यामुळे वेगवेगळ्या परिसरातील नानेकरवाडी, खराबवाडी आणि मेदनकरवाडी येथील ऐकून १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. कनकवले यांनी दिली आहे. यात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, परिसरात सर्व्हे सुरू केला असून आत्ता पर्यंत कोणी करोना पॉझिटिव्ह आढळले नाही, अशी माहिती देखील डॉ. कनकवले यांनी दिली आहे.