- चाकणच्या म्हाळुंगे पोलीस स्टेशनला केले सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझरचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२०) :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चाकण एमआयडीसी फेज – ३ उद्योजक संघटनेच्या काही निवडक संचालकांनी, खऱ्या कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवण्याकरीता म्हाळुंगेतील पोलीस स्टेशनला भेट दिली व त्यांची आस्थेने विचारपूस केली.
तसेच पोलिसांचा कोरोनापासून बचाव व्हावा, याकरिता संघटनेचे संचालक प्रवीण शिंदे यांच्या सौजन्याने सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे व पोलीस कर्मचारी यांनी संघटनेचे मनापासून आभार मानले.
याप्रसंगी चाकण एमआयडीसी फेज – ३ उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, सचिव निवास माने, खजिनदार भाऊराया माविनमर, संचालक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.
जयदेव अक्कलकोटे म्हणाले की, ”कोविड-१९ लॉकडाउन परिस्थितीत पोलीस बांधव रस्त्यावर उभे राहून, नागरिकांना सुरक्षा पुरवीत आहेत. खरे तर, या कर्तव्यनिष्ठ पोलिस बांधवांच्या कार्याला सलाम ठोकलाच पाहिजे. त्यांची कोरोनापासून सुरक्षा व्हावी, यासाठी आम्ही आमच्या परीने पाऊलं उचलत आहोत. सामाजिक भान जपत, म्हाळुंगेतील पोलीस बांधवांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत व्हावी, यासाठी या पोलीस स्टेशनला संघटनेच्या वतीने सॅनिटायझर स्टँड व सॅनिटीटाझरची भेट दिली. त्यामुळे काही अंशी तरी, पोलीस बांधव कोरोनापासून सुरक्षित राहतील.