- जुनी सांगवी व रुपीनगरमधील परिसर आज मध्यरात्रीपासून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी रात्री आलेल्या अहवालानुसार नऊ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात पाच पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.
दरम्यान आज अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण रुपीनगर, काकडे पार्क, चिंचवड, वाकड, पिपळे सौदागर, काळेवाडी, भाटनगर येथील रहिवासी आहेत. त्यामुळे शहरातील सकारात्मक कोरोना रुग्णांची संख्या ३९१ वर पोहोचली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात १९१ रुग्ण उपचार घेत असून, आजपर्यंत ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर, शहरातील १७० रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.
आज जुनी सांगवीतील ढोरे नगर परिसरातील राज मसाले – योगिता जनरल स्टोअर – ढोरे नगर लेन नं. १ – जैन मंदिर – सुमनश्री अपार्टमेंट – ढोरे नगर लेन नं. २ – आनंद सुपर मार्केट – शुभयोग मंगल कार्यालय – राज मसाले.
रुपीनगर परिसरातील सहयोगनगर येथील ओंकार जनरल स्टोअर बालाजी प्रिंटर्स – नॅशनल गरज – त्रिवेणीनगर रोड – अक्षय जनरल स्टोअर्स – गणेश इलेट्रिकल्म – ओंकार जनरल स्टोअर.
हा परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.