न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. २४) ओटास्कीम, निगडी येथे घडली. युसूफ मेहबूब कोरकू (वय २६, रा. ओटास्कीम, निगडी), तेजस रघुनाथ धनवडे (वय २३, रा. ओटास्कीम, निगडी) अशी खूनी हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
युसूफ यांनी रविवारी (दि. २४) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुना शेख, छोट्या मगर, वसीम शेख (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींची फिर्यादी युसूफ यांचा भाऊ मोहम्मद कोरकू यांच्यासोबत भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी मुन्ना आणि छोट्या या दोघांनी युसूफ यांच्यावर कोयत्याने वार करून खूनी हल्ला केला. यात युसूफ गंभीर जखमी झाले. आरोपांनी तेजस धनवडे या तरुणावर देखील खुनी हल्ला केला. तेजस यांच्या तोंडावर दगडाने मारून गंभीर जखमी केले.