न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- कुदळवाडी भागात दररोज कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या वाहनांवरील वाहनचालक व कामगारांना ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली फेस मास्क शिल्डचे नुकतेच वाटप केले.
कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटकाळात जनतेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या या बांधवांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता हे फेस मास्क शिल्ड देण्यात आले, असे यादव म्हणाले.