न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जून २०२०) :- विराज विलास जगताप या वीस वर्षीय तरुणाची सहा जणांनी मिळून हत्या केली. या प्रकरणी सर्व आरोपी जेरबंद आहेत. परंतु, समाजात तेढ निर्माण करणारे काही मेसेज, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याचे निदर्शास येत आहे.
या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, व्हिडिओ हे टिकटॉक, फेसबूक, इंन्स्टग्राम, टेलिग्राम, ट्विटरवर प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. असे केल्याचं आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून, सायबर सेल सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले आहे.