न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२०) :- मावळ तालुका पुन्हा एकदा हादरला असून आज मंगळवारी (दि. १६) रोजी देहुगांव परिसरात सतरा हाय रिस्क व्यक्तींच्या संपर्कातील सहा जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे देहूतील रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. करोना लागण झालेल्यांमध्ये दोन महिलांसह चार पुरुष असून, ६८ वर्षीय वयोवृद्ध महिला आणि एक १७ वर्षीय मुलाचा समावेश आहे. दोन्ही घर समोरासमोर असल्याने मायक्रोझोन परिसर सील करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे परिसरात आज दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. त्यामुळे आता मावळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २३ वर जाऊन पोहोचली आहे.