न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20 जून 2020) :- वाल्हेकरवाडीत हाताला काम नसल्याने एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना आज शनिवारी ( दि . 20 ) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली .
कृष्णात गणपत जगदाळे ( वय 38 , रा . दत्तनगर , थेरगाव ) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे . ते मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत . लॉकडाऊन झाल्यापासून त्यांच्या हाताला काम नव्हते . यामुळे ते आपल्या मूळगावी गेले होते . आता सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने ते चारच दिवसांपूर्वी गावाहून पिंपरी चिंचवड शहरात आले होते . मात्र त्यांच्या हाताला काम न मिळाल्यामुळे त्यांना नैराश्य आले असल्याचे मयत कृष्णात यांच्या नातेवाइकांनी सांगितले . याच नैराश्यातून ते सकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडले . जाताना त्यांनी आपल्या घरात आत्महत्येचा संदेश लिहून ठेवला होता .
तसंच त्यांच्या खिशातही सुसाइट नोट मिळाली . त्यामध्ये आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये , असे लिहिले होते . घरातून निघाल्यावर त्यांनी नदीच्या पलीकडे चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाल्हेकरवाडी येथे काचेची बाटली फोडून हाताची नस कापून घेतली . मात्र त्यामुळे त्यांना मृत्यू येत नसल्याचे दिसून आले . त्यानंतर त्यांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली .