न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 21 जून 2020) :- मित्रांसोबत गांजा पिताना झालेल्या भांडणातून चार जणांनी मिळून एका तरुणाचा गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून खून केला .
तरुणाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी डिझेल टाकून दोनदा मृतदेह जाळला . तरीही पूर्ण न जळाल्याने तरुणाचा अर्धा अधिक जळालेला मृतदेह पवना नदीत टाकून दिला . बिल्लू उर्फ विक्की उर्फ जसबीरसिंग गुलजारसिंग विरदी ( वय 19 , रा . मिलिंद नगर , रिव्हर रोड , पिंपरी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे .
नीरज अशोक जांगयानी ( वय 26 ) , ललित लालचंद ठाकूर ( वय 21 ) , योगेश केशव पंजवाणी ( वय 31 ) , हरज्योतसिंग रणजितसिंग लोहिर ( वय 22 , सर्व रा . पिंपरी ) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत .