न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22 जून. 2020) :- पिपरी चिंचवड येथील थरमॅक्स चौकातून बँकेचे एटीएम चोरुन पोबारा करणा-या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे . त्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे .
पोलीस कोठडीत पोलिसांनी आपल्याकडे चौकशी करू नये यासाठी एका आरोपीने स्वतःच्या पॅन्टच्या चेनच्या स्नरने स्वतावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला . पिंपरी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये रविवारी ( दि . २० ) दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा प्रकार घडला .
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर आणखी गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली . अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी ( वय २० , रा . हडपसर ) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे .
याप्रकरणी पोलीस हवालदार विश्वास कदम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पिंपरी पोलीस तपास करीत आहेत .