न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23. जून. 2020) :- कोविड 19 महामारीच्या ह्या संकट समयी समाजातील विविध घटक होरपळत आहेत. अश्या वेळी फक़्त शासकीय मदतीवर अवलंबून न रहाता समाजातील अनेक दानशूर आपले सामजिक दायीत्व समजून गरजुंच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. अश्या वेळी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. दिपक शहा समाजातील विविध घटकांसाठी धावून आले.
गेले तीन महिने त्यांनी संपुर्ण पिंपरी चिंचवड, तळेगाव अश्या ठिकाणी अन्न दान, धान्य वाटप, पुरोहितांना शिधा वाटप अश्या अनंत प्रकारे सातत्याने मदत कार्य चालू ठेवले. ह्या मध्ये त्यांचे संपुर्ण कुटुंब, प्रतिभा कॉलेजचे शिक्षक वर्ग व प्रमुख्याने त्यांचे लायन्स क्लब सदस्य सहभागी होते.
डॉ. दिपक शहा यांनी आपली सामजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब तळेगावच्या माध्यमातून तळेगाव येथेही शेकडो गरजूंना अन्न वाटप, नम्रता बिल्डर च्या माध्यमातून सुमारे 1500 बांधकाम मजुरांसाठी धान्य व गरजेच्या वस्तूं चे वाटप केले. ह्या बरोबरच आपल्या शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना आपले कुटुंबीय समजून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले.
ह्यात लॉकडाउन च्या काळात जेव्हा कोणकोणाला भेटू शकत नव्हते तेव्हा शहा सर ऑनलाइन तम्बोला गेम घेऊन आले व खेळीमेळीचे वातवरण तयार केले. कर्मचा-यांचे मानसिक संतूलन सुधारल्यावर शहा सरांनी सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रम राबविले.
ज्यात मुद्रा योगासारखी थेरपी, स्वयंपाक घरातील आयुर्वेद अश्या विविध विषयांची माहिती व सवयी त्यांनी प्रतिभा परिवारामध्ये त्यानी रुजवल्या.