न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- पीडित मुली आणि त्यांची आई हडपसर भागात आरोपी बापासोबत राहत होत्या . मागील तीन वर्षापूर्वी नराधम बापाने 11 वर्षाच्या ( आता वय 14 वर्ष आहे ) सावत्र मुलीवर बलात्कार केला . याबाबत पोलिसांनी त्याला अटक केली . न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली आणि त्याची रवानगी कारागृहात केली .
दरम्यान पीडित मुलगी आणि तिच्या लहान बहिणीला घेऊन आई मिळेल ते काम करत एका भागातून दुसऱ्या भागात जाऊन राहू लागली . मागील काही महिने या तिघींनी तळेगाव दाभाडे परिसरात वास्तव्य केले . तेथून या तिघी महिन्याभरापूर्वीच देहूरोड परिसरात राहण्यासाठी आल्या होत्या . नराधम बाप काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटला आहे . तो पुन्हा या कुटुंबाच्या संपर्कात आला . त्याने घरी आल्यावर अकरा वर्षाच्या लहान सावत्र मुलीवर बलात्कार केला .
मुलीच्या आईला ही बाब समजली . आईने मुलीला घेऊन दवाखाना गाठला . तेथील डॉक्टरांना घडलेली हकीकत सांगितली . डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली आणि याबाबत लगेच देहूरोड पोलिसांना माहिती दिली . पोलिसांनी नराधम सावत्र बापाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे . देहूरोड पोलीस तपास करीत आहेत .