- विविध विकासकामांसाठी येणा-या ५ कोटींच्या खर्चास स्थायीची मान्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणा-या सुमारे ५ कोटी २७ लाख रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोषअण्णा लोंढे होते.
फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कृष्णानगर व इतर ठिकाणी वोल्व्ह ऑपरेशन व्यवस्थापन करणेसाठी मजूर पुरवणेकामी येणा-या ७४ लाख २७ हजार रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी येणा-या ३६ लाख ८० हजार रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १९ मधील गोलांडे उद्याना शेजारील सी.डी. वर्कची उर्वरित कामे करण्यासाठी येणा-या र.रु. २९ लाख ७३ हजार रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभेमध्ये अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचा विशेष उल्लेखनीय कामगिरी बद्दल सभापती संतोष लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ताथवडे येथील बालाजी कॉलेज हॉस्टेल येथे महानगरपालिका हद्दीतील काही कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील काही जणांनी उपचार पूर्ण होण्यापूर्वी तेथून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी तेथे धाव घेवून संबधित कोरोना बाधितांच्या गराड्यामध्ये जाऊन बाधितांना पलायन करण्यापासून रोखले व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, प्रवीण तुपे, शिवसेना गतनेते राहुल कलाटे, नगरसदस्य राजेंद्र लांडगे, शशिकांत कदम, पंकज भालेकर, मयूर कलाटे, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, नगरसदस्या झामाबाई बारणे, भिमाताई फुगे, सुवर्णा बुर्डे, सुलक्षणा धर, पोर्णिमा सोनावणे, आरती चौंधे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये जाधववाडी चिखली येथे रस्त्यामध्ये वाहन उपलब्ध नसल्याने अडकून पडलेल्या गरोदर महिलेला मदत विद्युत विभागाच्या वाहनचालक रामदास गवारी, वायरमन अंकुश लांडगे, मदतनीस विलास माने यांनी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करून महिलेचे प्राण वाचवले त्याबद्दल संबंधित वाहनचालक, वायरमन व मदतनीस यांचाही सत्कार करण्यात आला.