- आज जुनी सांगवी, भोसरीतील दोन पुरूषांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23. जून 2020) :- पिंपरी चिंचवड शहरात आज
बुधवारी (दि. 24) रोजी 100 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आज मृत झालेले रुग्ण पवारनगर जुनी सांगवी ( पुरुष , वय- ६४ वर्षे ) , गवळीनगर भोसरी ( पुरुष , वय- ५५ वर्षे ) येथील रहिवासी आहे .
दरम्यान शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 2134 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 835 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह ) आलेले रुग्ण वैदुवस्ती पिंपळे गुरव, जैन मंदीर दिघीरोड , आदर्शनगर दिघी , नढेनगर , मोरेश्वर कॉलनी थेरगांव , अजंठानगर , चिखली , वडमुखवाडी , बिजलीनगर , नखातेनगर थेरगांव , बोपखेल , रामनगर , वाकड , नवी सांगवी , धावडेवस्ती , चिंचवड , प्राधिकरण , पवारनगर सांगवी , ताम्हाणेवस्ती चिखली , मोरेवस्ती , इंदिरानगर चिंचवड , साईबाबानगर चिंचवड , चक्रपाणी वसाहत भोसरी. दिघीरोड भोसरी , बौध्दनगर मोरवाडी , केशवनगर चिंचवड , संततुकाराम नगर सांगवी गावठाण , नेहरुनगर विजयनगर काळेवाडी , खंडोबामाळ भोसरी , कैलासनगर थेरगांव , डिमार्ट पिंपरी , पिंपरीगांव , चिखली , मोशी. काळभोरनगर , सिध्दार्थनगर दापोडी , मोहननगर , भाटनगर , एम्पायर इस्टेट यमुनानगर , इंदिरानगर , नाशिकफाटा , कुर्डुवाडी , सदाशिवपेठ , तळेगांव चाकण रोड येथील रहिवासी आहेत .
आज रमाबाईनगर पिंपरी , प्रियदर्शन नगर सांगवी , बेलठिकानगर थेरगांव , मोरवाडी , वैभवनगर , नानेकरचाळ पिंपरी , गुलाबनगर दापोडी , अंकुशचौक निगडी , तापकिर चौक मोशी , पिंपळे सौदागर , ताम्हाणेवस्ती , सद्गुरुकॉलनी वाकड , बौध्दनगर , मिलिंदनगर पिंपरी , उद्यमनगर पिंपरी , शिवशक्तीचौक भोसरी , हिंदचौक पिपळे निलख , विठ्ठलनगर नेहरुनगर , बापदेवनगर किवळे , यमुनानगर , रुपीनगर , नेहरुनगर , संभाजीनगर चिंचवड , च – होली , चिखली , सुर्दशनगर चिंचवड , बालाजीनगर चाकण , पवनानगर पुणे , लोहगांव , वडगांव मावळ , कोंढवा , येरवडा , कान्हे, नवीपेठ पुणे येथील रहिवासी असलेले कोविड -१९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे .
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .