न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- शहरातील हॉटस्पॉट भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होत आहे . त्या भागात ‘ कंटेनिंग ‘ करणे आवश्यक आहे . त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे . त्याबाबत पोलिसांशी चर्चा झाली आहे. तिथे ड्रोनचापण वापर करण्याचा विचार केला आहे.
ड्रोनद्वारे कंटन्मेंट झोनवर लक्ष ठेवण्यात येणार आहे . ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही . तेथील नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे .
नियमांचे पालन केले जात नसल्याने पिंपरी कॅम्प बंद केला आहे. अन्य ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास थेट तो भाग देखील सील केला जाणार आहे . किमान तीन दिवसांसाठी सील केले जाईल. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणे धुंकणे , मास्क न घालणा – यांविरोधात कारवाई केली जात आहे . दंडाच्या रकमेतही वाढ केली असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.