न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. 26) रोजी 143 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 81 पुरूष 62 महिलांचा समावेश आहे.
आज मृत झालेले रुग्ण केसरी नगर बोपखेल ( स्त्री , वय- ६५ वर्ष ) , रमाबाईनगर पिंपरी ( पुरुष , वय- ६० वर्षे ) व सिंहगड रोड पुणे ( स्त्री , वय -७५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 2405 वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात 919 रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या 02 वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह ) आलेले रुग्ण अजंठानगर , जयभीम नगर दापोडी , पवारनगर थेरगाव , गांधी वसाहत नेहरुनगर , भाटनगर पिंपरी , वैदुवस्ती पिंपळे गुरव , कुलदिप अंगण नेहरुनगर , संत तुकाराम नगर भोसरी , साईपार्क नेहरुनगर , डांगे थेरगाव , एचडीएफसी कॉलनी चिंचवड , भोईर ब्रीज आकुर्डी , चिखली रोड , केशवनगर कासारवाडी , आनंदनगर चिंचवड , घरकुल , नव महाराष्ट्र स्कुल पिंपरी , कृष्णानगर चिंचवड , धावडेवस्ती भोसरी , नाशिक फाटा कासारावाडी , रमाबाईनगर पिंपरी , गांधीनगर , बोपखेल गाव , मोरेवस्ती चिखली , तापकीरनगर काळेवाडी , दळवीनगर , बौध्दविहार दापोडी , सिध्दार्थ कॉलनी काळेवाडी , विठ्ठलनगर , कस्पटेवस्ती वाकड , तुळजाई कॉलनी थेरगाव , मिलींदनगर पिंपरी , जयगणेश साम्राज्य भोसरी , जाधव पार्क आकुर्डी , पदमजी पेपर मिल थेरगाव , महात्मा फुलेनगर चिंचवड , साने वस्ती चिखली , नटराज सोसायटी नेहरुनगर , निगडी प्राधिकरण , पवारनगर जुनी सांगवी , संभाजीनगर भोसरी , श्रीनगर थेरगाव , रिव्हर रोड पिंपरी , बौध्दनगर पिंपरी , वडमुखवाडी , म्हाडा बिल्डिंग पिंपरी , महिंद्रा बिल्डिंग पिंपरी , राजे शिवाजीनगर चिखली , ग्रीन एम्पायर चिखली , हिराबाई झोपडपट्टी कासारवाडी , काटेपुरम नवी सांगवी , पाटीलनगर चिखली , ममता नगर सांगवी , पिं . सौदागर , काळजेवाडी च-होली, दोस्ती बेकरी नेहरुनगर , विशालनगर , साईबाबानगर चिंचवड , रामनगर रहाटणी , मॉडल कॉलनी शिवाजीनगर , बोपोडी , सिहंगड रोड , देहुगाव , बिबेवाडी , दत्तवाडी , गोखलेनगर , पुणे येथील रहिवासी आहेत.
आज दत्तनगर दिघी , डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी , साईबाबानगर चिंचवड , इंदिरानगर चिंचवड , सोनगिरा काळेवाडी , निगडी प्राधिकरण , विद्यानिकेतन स्कुल निगडी , वडमुखवाडी , बौध्दनगर , तापकीरनगर मोशी , रमाबाईनगर पिंपरी , दापोडी , अजंठानगर , भाटनगर , ओटास्किम निगडी , नढेनगर काळेवाडी , आनंदनगर चिंचवड , गुलाबनगर दापोडी , मराठी शाळेजवळ कासारवाडी , सोनवणे वस्ती चिखली , वाकड , विनायकनगर पिंपळे गुरव , सिध्दार्थनगर दापोडी , विशालनगर पिं . निलख , शिंदेनगर सांगवी , पिंपळे सौदागर , नेहरुनगर , मोरेवस्ती चिखली , भोसरी , डिलक्स चौक पिंपरी , त्रिमुर्तीनगर चिंचवड , बोपखेल , हनुमानगर ताम्हाणेवस्ती , काटेपुरम चौक पिं . गुरव , देहुरोड , सेक्टर २५ निगडी , नाणेकर चाळ पिंपरी , शिवशाहीनगर दिघी , श्री स्वामी कॉलनी थेरगाव , कासारवाडी , सीएमई दापोडी , आंबेगाव , येरवडा , कल्याणीनगर , कोथरुड , शिरपुर धुळे येथील रहिवासी असलेले कोविड – १९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी ब दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा.