न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 26. जून. 2020) :- पिपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रतिबंधित बाबी वगळून इतर सर्व उपक्रम चालु करण्यासाठी काही अटी शर्तीच्या अधिन राहून परवानगी देणेत आली आहे.
महापालिका आयुक्तांनी २८ जुन २०२० पासून नाभिक दुकाने, ब्युटी पार्लर महानगरपालिका क्षेत्रात अटी शर्तीस अधिन राहून चालु करणेबाबत आदेश निर्गमित केले आहे.
केशकर्तन , केशकल्प , वॅक्सींग थ्रेडिंग करणेस परवानगी राहील. त्वचेसंदर्भात कोणतीही सेवा देता येणार नाही तसा बोर्ड दुकाना बाहेर लावणे. दुकानात काम करण-या व्यक्तीने ग्लोज अॅप्रन व मास्क वापरणे बंधनकारक राहील. ग्राहकाकरीता असलेली खुर्ची प्रत्येक सेवेनंतर सॅनिटाइज करणे बंधनकारक राहील. दुकान दर दोन तासानी सॅनिटाइज करणे बंधनकार राहील. ग्राहकांसाठी डिस्पोजेबल टावेल / नॅपकीन वापरणे आवश्यक आहे. नॉन डिस्पोजल उपकरणे प्रत्येक सेवेनंतर सॅनिटाइज करणे बंधनकारक राहील. प्रत्येक दुकानावर ग्राहकांने दक्षता घेणे बाबतचे बोर्ड लावणे बंधनकारक राहील. कोविड – १९ प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे निर्गमित करणेत आलेल्या आदेशाचे उल्लघंन करणारा व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला असे समजून कारवाईस पात्र राहील. तसेच सदर आस्थापना बंद करणेत येईल, असे आदेशात म्हटले आहे.