- आमदारांच्या कार्यकर्त्यांचे त्यांच्या आरोग्यासाठी थेट विठ्ठलालाच साकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 29. जुन. 2020) भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार तसेच भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहीती समोर आली आहे.
अत्यंत हायरिस्क वातावरणात सामाजिक बांधिलकीपोटी त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. तसेच शहरात येणा-या प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयात प्रशासनाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आमदार महेश लांडगे फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ होते. त्यांनी देखील शहराच्या कोणत्या भागात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. उपाययोजना म्हणून भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कशा पध्दतीने काम करत आहेत, याची माहिती फडणवीस यांना सांगितली होती.
त्यामुळे आमदार लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी थेट विठ्ठलालाच साकडे घातले आहे.