न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात ” कोरोना ” च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच सदस्य, पदाधिकारी आणि महानगरपालिका कार्यालयांमधील कर्तव्यावरील कर्मचारी / अधिकारी ” कोरोना ” यांनाही बाधा होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
त्याची संख्या विचारात घेवून महापालिका आयुक्तांनी करसंकलन विभागीय कार्यालये व प्रभाग कार्यालयातील करभरणा विषयक कामकाज वगळता दिनांक १० जुलै , २०२० पर्यंत महानगरपालिका अधिनस्त सर्व कार्यालयांमध्ये नागरीक, ठेकेदार व इतरांना प्रवेश निषिध्द करण्याचे आदेश दिले आहेत.