न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- आपसात भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २८) सकाळी दहाच्या सुमारास नवले वस्ती, ताथवडे येथे घडला.
तेजस अर्जुन जगताप (वय २५, रा. रावेत), ओमकार चंद्रकांत सपकाळ (वय २१, रा. निगडी), वैभव विजय ननावरे (वय २०), रोहित प्रशांत दुसान (वय २०), अविनाश रमेश सोनवणे (वय २०, तिघे रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस नाईक गणेश भरत गिलबिले यांनी बुधवारी (दि. १) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मंगळवारी सकाळी ताथवडेतील नवले वस्ती येथील सार्वजनिक रस्त्यावर आपसात मारामारी व मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते.