न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै. २०२०) :- देहुरोड कॅटोन्मेंट बोर्डाची सन २०२० ची प्राथमिक मतदारयादी जुन्या वॉर्ड रचनेनुसार तयार करण्यात आलेली आहे. बुधवारी दि. १) सायंकाळी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. कॅटोन्मेंट हद्दीतील सात वॉर्डात एकूण २३ हजार ५०८ मतदार असून, यामध्ये ११ हजार ८८२ पुरुष मतदार, तर ११ हजार ६२६ महिला मतदार आहेत. नवीन नावे समाविष्ट करणे, दावे, हरकती दाखल करण्यास २० जुलैअखेर मुदत देण्यात आली आहे.
सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट न केल्याने सात वार्डपैकी वॉर्ड क्रमांक तीनमध्ये मतदारसंख्या ५२ मतदार दिसत आहे. नागरिकांना बोर्डाची प्राथमिक मतदारयादी पाहण्यासाठी कटोन्मेंट बोर्ड कार्यालयात २० जुलैपर्यंत कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ .३० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध राहणार आहे.
प्राथमिक मतदार यादी २०२० :-
वॉर्ड क्रमांक एक ४,१५ ९, वॉर्ड क्रमांक दोन ४,५८३, वॉर्ड क्रमांक तीन ५२, वॉर्ड क्रमांक चार ३,२९३, वॉर्ड क्रमांक पाच ४,२९८, वॉर्ड क्रमांक सहा ४,८०७, वॉर्ड क्रमांक सात २,३१६.
२० जुलैपर्यंत मतदार यादीतील नाव व पत्त्यात दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करणे, यादीतील नावांबद्दल हरकती व दावे विहित नमुन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहे. यासाठी लागणारे अर्ज कार्यलयात उपलब्ध करण्यात आले आहेत.