न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०३ जुलै. २०२०) :- मागील चार महिन्यापासून कोरोना संसर्गाने देशात थैमान घातले आहे. या काळात समाजातील तळागाळातील गरजवंतांना औषधे, अन्नधान्य, जेवण त्याच बरोबर इतर जीवनाश्यक वस्तूचे ज्या समाजसेवकांनी मनोभावे सेवा पुरविली, अशा अठरा कोरोना योद्ध्यांचा सन्मान आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आला.
तुलसी वृंदावन, सन्मानपत्र, वारकरी उपरन, असे त्याचे स्वरूप होते. पंढरीची वारी अठरा दिवसांची असते, ज्ञानेश्वरी ग्रंथाला अठरा अध्याय आहेत. त्यामुळे यंदा वारी नसल्याने युवा कीर्तनकार ह.भ.प ऋषिकेश महाराज चोरगे, ह.भ.प विजय बोत्रे, ह.भ.प सुनील म्होकर यांच्यावतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
महापौर पुणे मनपा मुरलीधर मोहोळ, वरिष्ठ पोलिस नरीक्षक प्रतिभा जोशी, नगरसेविका लक्ष्मी दुधान, माजी नगरसेवक बंडू केमसे, रुग्णसेवक प्रहार संघटना उमेश महाडिक, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, डॉक्टर वैद्यकीय सेवा डॉ. हेमा ठिगळे, वारकरी सेवक विजय बराटे, सामाजिक कार्यकर्ते अतुल दौंडकर, खंडू चिंचवडे, विजय खळदकर, अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानव अधिकार नियंत्रण संस्था सम्राट खराटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक महेश स्वामी, संदीप जोशी, योगेश जाधव, मंथन फाउंडेशन आशा भट व उद्योजक संतोष बारणे यांचा गौरव यावेळी करण्यात आला.
गौरव पंढरीच्या वारीचा, गौरव समाजसेेवकांचा, गौरव आरोग्यदुतांचा, गौरव पंढरीच्या वारकऱ्यांचा आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो. यासाठी एवढ्या मोठ्या भीतीच्या सावटाखाली जनता असताना त्याच्यासाठी काही तरी करण्याची भावना मनात ठेवत ह्या कोरोना योद्ध्यांनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या या कामाला सलाम करत कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारणे हे आपले कर्तव्य समजत आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी यांचा सन्मान आम्ही करीत असल्याची भावना युवा कीर्तनकार हभप ऋषिकेश महाराज चोरगे यांनी व्यक्त केली.
विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले तर संजय भिसे यांनी आभार मान