न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०३ जुलै. २०२०) :- कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च अखेरीपासून महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात अनेक खाजगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद करून घरात बसले होते. त्याकाळात थंडी, ताप, सर्दी, खोकला, अतिसार, मधुमेह आदी रुग्णांची फार मोठी गैरसोय झाली होती. काही मोठे दवाखाने देखील रुग्णाची तपासणी करीत न्हवते सर्वत्र भितीचे सावट होते.
सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, ज्येष्ठ नागरिकांच्या कुटूंबीयांची हालत मेटाकुटीला आली होती. अशा भितीच्या वातावरणात आपल्या जीवापेक्षा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून मार्च ते आजपर्यंत चिंचवड येथील आयुष क्लिनिकच्या स्त्रीरोग तज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. नूतन वंजारे-निकम तसेच त्यांचे पती जनरल प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहूल निकम यांनी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कोविड-१९ (कोरोना) रुग्णाची देखभाल, रुग्णाची अस्थेने विचारपूस करून त्यांना धीर, दिलासा देत उपचार करीत आहे. अशा डॉक्टर दांम्पत्याचा चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने प्रवासी संघाचे दादासाहेब माने, पत्नी निर्मला माने, मुकेश चुडासमा, गुलामअली भालदार यांनी ‘डॉक्टर्स डे’ औचित्य साधून शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी सूरज आसदकर, गुलाब लोंढे, कमल भाटी, सानिया भालदार, मधुकर निकम उपस्थित होते.
नागरी सत्काराप्रसंगी डॉ. राहूल निकम म्हणाले, नागरीकांनी कोरोना प्रादुर्भाव काळात आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, कामगारांनी विशेष काळजी घ्यावी. वारंवार हात धुवावे, चेहर्यावर मास्क, रुमाल घालून नियमांचे पालन करावे, घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी, नागरीकांना मदत लागल्यास आम्ही सदैव तयार आहोत.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार म्हणाले, जिल्हाधिकार्यांनी गृहसंकुलात येणार्या-जाणार्यांसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहे. त्याप्रमाणे नियमांचे पालन करावे, गृहसंकुलात कोणी आजारी असल्यास त्यांना सोसायटीच्या पदाधिकार्यांनी मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. ज्या परिसरात दवाखाने बंद असतील. तेथील डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रुग्ण सेवेसाठी दवाखाने उघडे ठेवावे, परप्रांतीय, स्थानिक नागरीक यांना बाहेर जाण्याची आवश्यकता भासल्यास मेडिकल सर्टिफिकेट देताना आवाजवी पैसे आकारू नये, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार सूरज आसदकर यांनी मानले.