न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- देहूरोड शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने ही इमारत मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केली असून, संबंधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना तपासणीचे निर्देश दिले आहेत.
शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात एक कर्मचारी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. कारखान्यातील रुग्णालयास पूर्वकल्पना न देता एक जुलै रोजी तो या रुग्णालयात दाखल झाला होता. पाच जुलै रोजी त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. कारखाना प्रशासनाने तातडीने आदेश काढून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तपासणीच्या सूचना केल्या आहेत.