- अनुयायांनी संयम बाळगावा; अण्णा बनसोडे यांचे पिंपरीकरांना आवाहन!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच घरातील कुंड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. या घटनेचा निषेध सध्या राज्यभर सुरू आहे.
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही याचा तीव्र निषेध केला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या घटनेचा निषेध नोंदवित असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू देऊ नका, निरर्थक गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. पोलिसही लवकरच या आरोपींना अटक करतील. त्यांच्यावर योग्य कारवाई करतील. पिंपरीच्या नागरिकांनी शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार करु नये. शासकीय तसेच खासगी मालमत्तांचे नुकसान करू नये, असे जाहीर आवाहन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.