न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची आजची सभा दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे हे होते.
दिवंगत विद्यमान नगरसदस्य व माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, माजी नगरसदस्य विठोबा लांडे, संजय साळवी तसेच माजी नगरसदस्य वसंतराव लोंढे यांचे चिरंजीव महेश लोंढे यांचे निधन झालेले असल्याने सभा शुक्रवार दि.१० जुलै पर्यंत तहकूब करण्यात आल्याचे सभापती संतोष लोंढे यांनी जाहीर केले. यावेळी स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.