- काळेवाडी, चिखली, दापोडी, पिंपरी येथील रुग्णांचा कोरोनाने मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी(दि. ०८ जुलै) रोजी २९० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २७ पोलीस आज करोनाबाधित झाले असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्यातील ११ जणांचा समावेश आहे.
आज देहुरोड किवळे (स्त्री, वय-४० वर्ष), काळेवाडी (पुरुष, वय- ८० वर्षें), घरकुल चिखली (पुरुष, वय- ४६ वर्षें), दापोडी (पुरुष, वय- ३६ वर्षें), गांधीनगर, पिंपरी (स्त्री, वय- ४९ वर्षें), धुळे (पुरुष, वय- ६६ वर्षें), बावधन खुर्द, पुणे (स्त्री, वय- ६८ वर्षें) येथील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५४९३ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात १८८० रुग्ण उपचार घेत असून, महापालिका हद्दीतील रहिवाशी परंतु, इतर ठिकाणी उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५०९ वर पोहोचली आहे. आज पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.