न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. जुलै. २०२०) :- चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ संचालित श्रीमती के जे गुप्ता ज्यू कॉलेज चा इ १२ वी विज्ञान शाखेचा सन २०१९-२०२० सालचा १२ वी बोर्ड परीक्षे चा निकाल १०० टक्के लागला असून दोन विद्यार्थांनी ९०%पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे.
चि. निशांत अहिरराव ९०.९२ टक्के, कु. मोनिका शेटे ९०.७७ टक्के, कु. देवयानी जाधव ८७.५३ टक्के या प्रथम ३ गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी मनपूर्वक अभिनंदन केले. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक विजय जाधव, अमित बच्छाव यांनी देखील सर्व गुणवंत विद्यार्थ्याना पुढील उजवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच सर्व शिक्षक वर्गाचे देखील उत्कृष्ट निकालाबाबत अभिनंदन केले. या वेळी कॉलेजचे प्राचार्य बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, ज्यू कॉलेज विभाग प्रमुख अविनाश सावंत उपस्थित होते.