न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. जुलै. २०२०) :- करोनाच्या काळात अत्यावश्यक असणारे सॅनिटायझर, हॅडवॉशसह ६५ हजारांचा ऐवज दुकानाचे कुलूप तोडून चोरून नेला. हिंजवडी, मुळशीतील जांभे येथील एका मेडिकल दुकानात बुधवारी (दि. २२) हा प्रकार उघडकीस आला. अश्विनी संजय वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांचे जांभे येथे मेडीकल दुकान आहे. २१ जुलै रात्री ९ ते २२ जुलै सकाळी साडेसहा या वेळेत दुकान बंद होते. त्यावेळी चोरटयांनी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर आतील शेम्पू, सॅनिटायझर, हॅड वॉश, बिस्कीट, आयुर्वेदिक औषधे असा ६५ हजारांचा ऐवज लंपास केला.