न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६. जुलै. २०२०) :- आरोपी शकील आणि त्याचा एक साथीदार फिर्यादी गौड यांच्याकडे आले. आरोपींनी गौड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. गौड यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून आरोपींनी गौड यांना हाताने तसेच दगडाने मारहाण केली.
या मारहाणीत गौड यांचे डोके फुटले. ही घटना शनिवारी (दि. २५) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास लांडेवाडी भोसरी येथे घडली. बिफुल विश्वनाथ गौड (वय २२, रा. लांडेवाडी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
शकील खाजाभाई काझी (वय ३१, रा. लांडेवाडी, भोसरी) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.