न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७. जुलै. २०२०) :- सांगवी परिसरात चार वर्षीय चिमुकली त्रास देत असल्याच्या कारणामुळे आईनेच तिचा खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मृत मुलीच्या आईला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षीय चिमुकलीचा आईने खून केल्याची घटना सांगवीत घडली आहे. या महिलेच्या सासूचा मृत्यू झालेला असल्याने त्यांचा दशक्रिया विधीसाठी या महिलेचे कुटुंबीय आज बाहेरगावी गेले होते. दरम्यान घरात सहा महिन्यांचा मुलगा व चार वर्षांची चिमुकली होती. दरम्यान सकाळी ही मुलगी त्रास देत असल्याने आईने तिचा खून केला.
या मुलीचं डोकं भिंतीवर आदळलं असण्याची शक्यता असून, तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचे व्रण देखील आहेत. दरम्यान, आरोपी महिलेचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.