न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. जुलै. २०२०) :- जुना मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत सकाळी एक कंटेनर उलटून अपघात झाला. यात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कामशेत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातामुळे काही काळ दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी होती. मात्र कामशेत पोलिसांनी घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून लेन खुली केली. विठ्ठल अन्नपा क्षीरसागर (वय अंदाजे ३२, रा. सांगली) हा कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे.