न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- आंदर मावळातील वहाणगाव येथील एका फार्महाऊसच्या मॅनेजरवर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या फार्म हाऊस व्यवस्थापकाचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झाला.
मिलिंद मणेरीकर (वय ५०, रा. तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वहाणगावजवळ संकल्प फार्म हाऊस येथे ते व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. गोळीबाराच्या घटनेला आठवडा झाला तरी या प्रकरणामागील कारण अथवा आरोपींची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. वडगाव पोलिसांनी या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.