न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा सन २०१९-२० सालचा १० वी बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला असून, तब्बल १२४ विद्यार्थ्यानी ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. यात घाडगे अथर्व ९९.२० टक्के, कुलकर्णी पार्थ ९७.८० टक्के, अमृतकर रुचिरा ९७.२० टक्के, नागरगोजे स्नेहा ९७.०० टक्के, ब्राम्हणकर अथर्व ९६.८० टक्के, कुलकर्णी श्रेया ९६.८० टक्के या पाच विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली.
सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, उपाध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, अमित बच्छाव यांनी उत्कृष्ट निकालाबाबत अभिनंदन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, किसन अहिरे, लीला मुटकुळे, शब्बीर मोमीन, अजिनाथ गुराळकर व १० वीचे सर्व वर्गशिक्षक उपस्थित होते.