न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. जुलै. २०२०) :- अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेली दुचाकी मोटारीवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. २७) दुपारी दोनच्या सुमारास जगताप डेअरी जवळ हा अपघात झाला. वेणूगोपाल प्रसाद इदनूर (वय २९) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याप्रकरणी राजू प्रसाद इदनूर (वय २६ रा. गुरुवार पेठ, पुणे) यांनी मंगळवारी (दि. २८) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एमएच – १५ – बीएन -७२९९ या मोटारीवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेणूगोपाल हे दुचाकीवरून चालले होते. दरम्यान, जगताप डेअरी येथे आरोपी चालकाने अचानक मोटारीचा ब्रेक दाबला. त्यामुळे वेणूगोपाल यांची दुचाकी पाठीमागून मोटारीवर आदळली. यामध्ये जखमी झालेल्या वेणूगोपाल यांचा मृत्यू झाला.