न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- चाकण एमआयडीसीतील कुरुळी येथे राधेशाम वेलफन प्रा. ली. ही कंपनी आहे. कंपनीच्या मशीनचा पार्ट लोकल मार्केट मध्ये कुठे मिळतो, याची ऑनलाईन चौकशी केली. Hew Precision Works pvt ltd या कंपनीत पार्ट मिळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, कंपनीचे संचालक विशाल पंजाबी यांनी Hew Precision Works pvt ltd या कंपनीशी संपर्क केला. कोटेशन मागवून त्याद्वारे ऑनलाईन पेमेंट देखील केले.
पेमेंट झाल्यानंतर पाच दिवसांनी फिर्यादी भोसरी येथील संबंधित कंपनीत गेले. त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आले की, केलेले पेमेंट हे आमच्या बँक खात्यावर केलेले नाही. अन्य खात्यावर केले आहे. कंपनीचा मेल आयडी हॅक केला असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार १८ जून रोजी एमआयडीसी कुरुळी, चाकण येथे कंपनीत घडला. अजय भीमराव होले (वय ३३, रा. श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.