न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी येथील उड्डाणपुलाशेजारील नव्या जागेत शनिवारपासून (दि. १) फुल बाजार सुरू होणार आहे. याची माहिती पिंपरी चिंचवड फुलबाजार अडते संघाचे अध्यक्ष राजकुमार मोरे यांनी दिली.
त्यानुसार आता या जागेत फुल विक्रेत्यांनी विक्री सुरू केली आहे. पिंपरी चिचवड महापालिकेच्या पुढाकाराने पिंपरी येथील उड्डाणपुलाचा शेजारील रस्त्यावर २७ गाळे बांधून फूल विक्रेत्यांना देण्यात आले. तेथे वीज व पाण्याची सोय करण्यात आली आहे. या फुल बाजाराचे उद्घाटन नोव्हेंबर २०१९ मध्ये झाले होते. मात्र, टाळेबंदीसह कारणांमुळे याठिकाणी फुलबाजार सुरू होण्यास अडचण निर्माण झाली होती.