न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- आठ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका डॉक्टरची तब्बल ४० लाखांना फसवणूक झाल्याची घटना शहरात उघड झाली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.अमित अनंत वाघ असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून, त्यांनी निगडी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
या घटने प्रकरणी रोहन पवार नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादी डॉक्टर वाघ यांना त्यांच्या रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असलेले व्हेंटिलेटरसह इतर साहित्य घ्यायचे असल्याने त्यांना पैशाची आवश्यकता होती व यासाठी त्यांना कर्ज हवे होते, त्यातूनच त्यांची फसवणूक झाली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी दिली आहे.