न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणाने विवाहित तरुणीच्या पोटात चाकूने हल्ला करीत तिचा खून केला आहे. त्यानंतर स्वतः आरोपीनेदेखील पोटात चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास चिंचवड परिसरातील अजंठानगर येथे घडली असून, या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आरोपी तरुण गंभीर जखमी झाला आहे. आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हत्या झालेल्या महिलेचे नाव राणी सतीश लांडगे (वय २९) व आरोपीचे नाव अरविंद शेषराव गाडे (वय ३० दोघेही रा. अजंठानगर, चिंचवड). चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.