न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती निमित्त महानगर पालिका मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके,जयंती समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप,माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, समितीचे पदाधिकारी विशाल कसबे, सचिन पारवे, सुनील भिसे, गणेश खंडाळे उपस्थित होते.
तसेच निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके,विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसदस्य एकनाथ पवार, नगरसदस्या सुमन पवळे, अनुराधा गोरखे, कमल घोलप, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष दत्तू चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप,माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, समितीचे पदाधिकारी विशाल कसबे, सचिन पारवे, सुनील भिसे, गणेश खंडाळे, संदीपान झोम्बाडे, भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल, नाना सरोदे, माजी नगरसदस्य प्रल्हाद सुधारे आदी उपस्थित होते.