न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. ऑगस्ट. २०२०) :- उस्मानाबाद येथून गोमांस आणि बैलाचे मांस चार टेम्पोमधून घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती फिर्यादीस मिळाली. फिर्यादीनी त्यांच्या संपर्कातील पिंपरी, तळेगाव येथील सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पहाटेच्या सुमारास थांबले आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून शिरगावात तीन तर तळेगावच्या हद्दीत एक असे एकूण चार टेम्पो पकडले.
संशय येऊ नये म्हणून मांसाच्या वर भाजीपाला असलेले कॅरेट ठेवण्यात आले होते. तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली दडके यांच्यासमोर पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नागनाथ चनप्पा नागेशी (वय ३८), अन्वर शब्बीर शेख (वय २४), राहुल सुरेश बेळे (वय २६) अशी टेम्पो चालकांची नावे असून यांच्यासह क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरगाव आणि तळेगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.