न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२०) मधुरे इन्फ्रो इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीत सुपरवायजरने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून कंपनीचा फायदा करण्याच्या दृष्टीने कंपनीच्या वेगवेगळ्या साइटवर काम करण्यासाठी लेबर लागतील असे सांगून ते पुरविण्यासाठी कंपनीच्या संचालकांना विश्वासात घेऊन ३० ते ४० लेबर आणण्यासाठी त्याने ८० हजार रुपये आणि वाहनाचा खर्च म्हणून २० हजार रुपये कंपनीकडे यवतमाळ येथील एका बँकेच्या खात्यावर मागितले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने कंपनीकडे येण्याचे नावच घेतले नाही. दरम्यान एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे कंपनीच्या लक्षात आले.
हा प्रकार मधुरे इन्फ्रो इंजिनिअरिंग प्रा. लि. रुपीनगर तळवडे येथे २ मे ते १५ जून या कालावधीत घडला. योगश धनवडे असे सुपरवायजरचे नाव आहे. त्याच्यासह संजय एस चमेडिया या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अॅडमिन एक्झिक्युटिव्ह अनंत श्रीरंग केंद्रे (वय ३२, रा. मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.